रा. ना. चव्हाणांचे प्रबोधन हे त्यांचे पसायदान आहे असे मला वाटते!
हिंदुत्वाच्या नावाखाली देशात ध्रुवीकरण केले जात आहे. रा. ना. चव्हाणांनी अशा विनाशकारी शक्तींच्या विरोधात आपली लेखणी चालवली असती. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूसंघटना यावर त्यांनी लिहिलेले लेख वाचले तर त्यांच्या प्रबोधनाची दिशा आणि आशय आपल्या लक्षात येईल. ते समन्वयवादी व सौम्य प्रकृतीचे होते. सत्य-असत्याशी आपले मन ग्वाही करून त्यांनी सत्य स्वीकारण्याची व असत्य नाकारण्याची हिंमत दाखविली.......